Saturday, July 16, 2022

डायबिटीस आणि साखर यांचे नाते

          डायबिटीस

आणि साखर यांचे नाते हे काय असणार मधुमेह साखर जसे काशीला जाऊन पूर्वी

आवडती गोष्ट सोडायचे
तसे  डॉक्टरी सल्याने साखर कमी किंवा  पूर्ण बंद करतात 

त्याचा आज आपण  हिशोब मांडणार आहोत
समजा मधुमेह रुग्णाने 1चमचा साखर प्रत्येक चहा
किंवा कॉफीत कमी केली तरी दिवसाला दोन कपात
10ग्राम साखार कमी झाली रोज 
याचा अर्थ सरळ आहे एका वर्षात 3650 ग्राम साखर बचत
40 रुपये प्रमाणे रुपये 146 

पैशाची बचत एका वर्षात तर  दहा वर्षांत रुपये वाचले रुपये
1460

ए वढेच नाही तर स्वादुपिंड यातील इन्सुलिन फॅक्टरीतील 
    कामगार  मधुमेह  नसलेल्या मध्ये 1अब्ज असतात (बीटा पेशी)
ही संख्या नक्की कमीच असणार आणि आजारात
हे कामगार धीम्या गतीत काम करणार 
 थोडा कामाचा भार कमी देणे गरजेचे आहे कारण
शेवट पर्यंत आपण काम करून घेउ शकू.
हे कामगार कधी ही युनियन करत नाहीत.

10 ग्राम साखार रोज कमी  याचा अर्थ 10000 मिली ग्राम
अंदाजे ग्लुकोज साठी इन्सुलिन करणें नाहि
सर्वात चांगली गोष्ट  डायबेटिस चा शरीरातील अपाय साखरेचा
रोखण्यासाठी मदत होईल 
मी खूप वर्षा पूर्वी एक पुस्तक वाचले त्यात एक डॉक्टर आणि
रोगी यांच्यात संवाद श्रीकृष्ण अर्जुना सारखा होत असतो
आखेर रोगी कंटाळून विचारतो हे खाऊ नका ते करा
एक तरी गोस्ट चांगली आहे का  मधुमेही रोग्याला
डॉक्टर सांगतात सर्व सल्या प्रमाणे वागलं  तर तुमचे आरोग्य
 दीर्घ काळ चांगले राहील.

       डॉक्टरी सल्याने च वागा