माधुमेह पूर्व स्टेज काय आहे ?
मधुमेह उबरठ्यात आहे याचा अर्थ अजून तो मधुमेही नाही
आणि नॉर्मल ही नाही उंबरठा ओलांडून तो कधी ही मधुमेही
होईल आणि उंबरठा सोडून नॉर्मल पातळी गाठील
कसे ते पाहूया
1नॉर्मल रक्तातील साखर (ग्लुकोज) उपाशी पोटी 100mg/dl
हुन कमी असेल.
2मधुमेही रुग्ण गणला जाईल जर रक्तातील साखर (ग्लुकोज) उपाशीपोटी 126mg/dl किंवा त्याहून अधिक असेल तर
3.मधुमेह पूर्व स्टेज
असेल तर
रक्तातील साखर(ग्लुकोज) 100mg/dl किंवा 125mg/dl
पर्यंत मधुमेह पूर्व स्टेज आहे
126mg पासून अधिक झाल्यावर तो मधुमेह उंबरठा
सोडून गृह प्रवेश (शरितात )मधुमेह चे लेबल लागेल.
मधुमेहाची दुसरी परीक्षा रक्तातील साखर(ग्लुकोज)
ग्लुकोज पाणी पिउन 2तासांनी करतात
1.नॉर्मल : जर रक्तातील साखर(ग्लुकोज) ची पातळी
2 तासांनी 140mg हुन कमी असेल तर
2. मधुमेही रुग्ण: जर वरील तपासणीत
निकाल रक्तातील दोन तासांनी साखर(ग्लुकोज)
200mg किंवा अधिक असेल तर
3 मधुमेह पूर्व स्टेज: रक्तातील साखर (ग्लुकोज)
दोन तासांच्या नंतर च्या पाहणीत 140mg किंवा त्याहून अधिक
आल्यास
याचा अर्थ 140mg पासून 199mg पर्यंत मधुमेह पूर्व स्टेज
आहे. यानंतर पूर्व स्टेज उंबरठा ओलांडून गृह प्रवेश करील
मधुमेह पातळी गाठेल.
आता आपण
जीवन पद्धतीत हस्तक्षेप करून काय फायदे ते बघू:
1 शारीरिक व्यायाम ने इन्सुलिन संवेदनशील होते
2 शारीरिक व्यायाम हे स्नायुत ग्लुकोज ग्रहण करविते
3 शारीरिक हालचाली कमी झाल्यास GLUT-4 अकार्यक्षम
राहते यामुळे पेशीत ग्लुकोज जाउ दिले जात नाही
4 शारीरिक व्यायाम बीटा पेशींचे कार्य सुधारते
मधुमेह पूर्व स्टेज(Pre-Diabetes)
मध्ये इन्सुलिन सवेदना शील करतात.
बीटा सेल (पेशी) इन्सुलिन निर्माण करतात.
5 मधुमेहा चा धोका 18 %ते 40% कमी होतो जरसिरिअल फायबर
होल ग्रेन आणि bran खाण्यात असतील.
6 साखार युक्त पेय पिणे कमी केल्यास मधुमेहाचा धोका
कमी होतो.
एका पहणीनुसार एकाहून अधिक साखर युक्त पेय
दररोज पिण्यात येतअसतील तर त्या लोकात 26% मधुमेहाचा
धोका वाढतो जर जी माणसे साखर युक्त पेय एकाहून
कमी दर महिन्याला पितात यांची तुलना केल्यास.
7 आहारातील बदल हा फार गरजेचा आहे जो मधुमेह पूर्व स्टेज (Pre-Diabetes)
ला मधुमेह होण्यापासून रोखेल.
8 जीवन पध्दतील बदल मधुमेह पूर्व स्टेज ला मधुमेह
होण्यापासून जरी रोखत असेल तरिही ते रुग्ण कसे आहेत
त्याच्या बीटा सेल किती कार्य शील आहेत आणि रक्त तिल साखर
वाढ या वर अवलंबून आहे.
Ref Medicina (Kaunas) 2019 Sep :55(9):546
Radia Marium Modhumi Khan
Zoey Jia Yu Chua
Jia Chi Tan
Yingying Yang
Zehuan Liao and Yanzhao