कॅलेंडर वय आणि जैविक वय
एक वय असते कॅलेंडर प्रमाणे आपण ते मार्क करतो
वाढदिवसाचा दिवस
वाढदिवसाच्या मेंण बत्या मोजून कळते वय जास्त असेल तर
मेणबत्ती वर लिहितात 7 आणि 5 75झाले
आपण असे वाढदिवसा चा दिवस function पाहतो
हळूच कुजबूज होते आत्ता फार थकले कवळी तर केव्हाच
लागली घरात चालणे ही कठीण हातात काठी आली.
चेहरा पाहून तर 80 पार केली असे वाटते.
मित्रानो आणि एखादा समारंभ असा असतो 60 65 वय
वाटत रोज 2 राऊंड शिवाजी उद्यानाला मारतात काठी नाही
की कवळी नाही
वाढ दिवस असतो 70 वर्षे पुरी केली त्याचा
हा 5 एक वर्ष लहान असल्याचा बोनस मिळतो
पोस्टात बँकेत पासपोर्ट वर वय 70 लागतें
असे का ? जैविक वयाचे घड्याळ स्लो चालते
या व्यक्तीची सिगारेट दारू यांच्याशी जवळीक नसते.
कॅलेंडर वय जन्म दिवसा पासून मोजतात .
समजा कॅलेंडर वय 40 असणारी चार माणसं
असली तरी काही 40 हुन अधिक भासतील
काही 40 हुन कमी तर काही40 ची वाटतील
हे वरील बदल जैविक वया च्या बदलाने भासतील.
जैविक वय Biological Aging
यात सर्व माणसं एकाच गतीने वृद्ध होत नाही
जरी त्यांच कॅलेंडर वय एकच असले तरी काही लोकांची
शारीरिक क्रीया अधिक लवकर मंदावतात
कॅलेंडर वय मात्र फक्त सरलेली वेळ दर्शवते.
जैविक वय खालील गोष्टीं वर अवलंबून असते
1निरोगी जीवन पद्धती वर अवलंबून असते
2रक्त वाहिनीच्या वृद्धत्व लांबले तर
3कौटुंबिक इतिहास हृदय विकाराचा
जैविक वय मापन पद्धती
1 टिलोमर लेंग्थ
टेलोमर पेशीतील क्रोमोसोम च्या शेवटी
बुटा च्या लेस च्या अखेरीला मेटल असते
तसेच असते
टेलोमर ची लांबी हळू हळू कमी होते
आणि जैविक वय वाढते
2 DNA Methylation
जैविक वय वाढवणारे फॅक्टर्स
1 स्तुलता
2 मधुमेह
3 प्रदूषण
4 अति साखर सेवन
5 धूम्रपान
6 दीर्घ काळ तणाव
7 आल्कोहोल सेवन
8 chronic kidney Disease
9 Family history of cardiovascular
Disease
10 अति मिठ सेवन
11अतिमास आणि स्निग्ध सेवन
Saturated fats
जैविक वय कमी करणारे फॅक्टर्स
1 निरोगी झोप
2 फळे आणि भाज्या अधिक सेवन
3 शेंगा ड्राय फ्रुटस
4 पालकांचे दीर्घ आयुर्मान
5 Physical activity
जैविक वय हे जसे वाढते तसे पेशींचे आणि
अवयवांचे कार्य मंदावते तसेच कॅलेंडर वय केवळ
जन्म वेळे पासून गेलेला काळ .
आज आपण कॅलेंडर वय आणि जैविक
वय यांची माहिती घेतली
जैविक वय साधरण लोकात कॅलेंडर वया
बरोबर असते जी मंडळी शंभर किंवा त्याहून
अधिक जगतात त्यांची रक्तवाहिन्यांचे वार्धक्य
लांबते .आणि काही रोगामुळे रक्तवाहिनी लव
कर वार्धक्याने ग्रासतात.
एक महत्वाची माहिती आपले हार्ट लिव्हर kdney
यांची वय ही कॅलेंडर वयाहून वेगळी असतात
आपली जीवन पद्धती निरोगी असेल तर
आपण सत्तरी त असून ही 60 चे वाटू.
Ref J Am coll Cardiol
2020 Mar 3 : 75 (8):919-930
Magda R Hamczyk etal
No comments:
Post a Comment