काठी
काठी ने दिले अन्न फुलया सुमनसी
एके वेळी तिची सुमने तोडली
पुढील प्रवास काय
मनी विचारी
दिले फेकुनी अग्नित
म्हणे मानव थंडी भारी मी का न शेकु माझे अंग
कोणी सांगे सोडा खुळा विचार पर्यावरण
आज
असे शुभ मंगल
कन्या आली मंडपात
फेकून देती काठीस. अग्निकुंडात
तसेच होळीस ही माझे मरण
एक दिवस भाग्याचा
कोणी वृध्द सांगे अरे तू शोकन करावा
माझ्या रक्तमासाच्या काठ्या सोडूनी गेल्या विदेशी
साथ मला देशील मी तुझा होईन ऋणी
No comments:
Post a Comment