Tuesday, July 23, 2024

कॅन्सर लॉग कील मराठी





कॅन्सर लॉग kill 
काय आहे याचा अर्थ हे समजणं जरूर आहे कारण याने आपल्या शंका
दूर होतील रुग्णाला केमोथेरपी देतात हे सर्वांना परिचित आहे पण 
सायकल चक्र वरचेवर का देतात एका वेळी डोस पुरा का नाही करत 
या साठी लॉग किल जाणून घेण्याची गरज आहे
लॉग म्हणजे गणित आहे सोप्पे आहे
या गणितात १० हा पाया आहे
१०×१=१०^१ याचा अर्थ १० चा लॉग १
तसेच १०×१०=१०० लॉग २
सोप्पे आहे १० लॉग १
१०० लॉग २
१००००००००० लॉग ९
१०००००००००००० लॉग१२
कॅन्सर पेशी मारा यची ताकद  केमोथेरपी लॉग किल २-३इतकी
आहे
याचा अर्थ जर कॅन्सर रोगी १०^९  कॅन्सर पेशीघेऊन आला तर
केमो थेरपी २ लॉग कमी करणार असे धरले
तर १० वर ९ शुंन्या तून दोन शुन्य कमी झाली
याचा अर्थ आता ९ वाजा २ 
एका वर ७ शुन्य इतक्या पेशी कॅन्सर च्या जिवंत
 आहेत किंवा ३लॉग किल झाला तर १ वर६ शुन्य
बाकी आहेत.१०००००० या कॅन्सर पेशी पुढील २
सायकल चक्रात कमी होतील काय म्हणता २
सायकल ने शून्य पेशी कॅन्सर ची राहील
बरोबर ३लॉग किल प्रमाणे 
पण असे होत नाही कारण हे गणित झाले कॅन्सर पेशी ची निर्मिती होईल
आता जितके कॅन्सर निदान लवकर तेवढे यश आधिक 
लवकर निदान १० चा ९ घात अंक किंवा लॉग ९
त्या वेळी कॅन्सर १ग्राम असतो १०लाँग १०ग्राम ११लॉग वजन १००ग्राम
आणि एक किलो कॅन्सर १० चां १२ वा घात १२ लॉग हा कॅन्सर घातक 
ठरू शकतो. 
आता प्रशन आहे एक दिवसा चे अंतर दोन केमोत का नाही या मुळे
रुग्ण लवकर सायकल मुक्त होईल 
२१ दिवसाचे अंतर नको.
तसे नाही होत कारण 


 शरीरातील कॅन्सर शी लढा देणारी सेना पांढऱ्या पेशी मरतात

केमॉ थेरेपी ने त्या नवीन तयार होणे गरजेचे आहे.

लॉग किल हा शोध Skipper Norton –Simon

आणि Goldie Coldman यांनी लावला.






No comments:

Post a Comment