आज माझी शुगर वाढली
आज माझी शुगर वाढली
म्हणता म्हणता तीन शतके गाठली
कशी काय रक्ताने केली भाडवलदारी
साठे बाजी दुसरे काय
स्नायू मागती शुगर खोटे सांगीआज नाही
कोणी ग्राहक संघ सांगे इथे स्नायू उपाशी
मेंदू ही कार्य करती मंद
अवयव मग कशी काम ते करील
आज मझी शुगर वाढली हो
काल मात्र हद्द झाली
रक्तातील साखर ४०० झाली
तेव्हा इन्सुलिन ने ताबा घेतला
रक्तातील साखर वाटली खुल्या बाजारी
स्नायू पुन्हा जोमाने काम करती
मेंदू स येई नवी चेतना
शुगर वर लगाम बसाला
मी ही तोंडा वर घातला लगाम
कृपया वैद्यकीय सल्ला घ्या
No comments:
Post a Comment