Monday, January 2, 2023

लुकेमिया आणि बेंझिन

लुकेमिया &बेंझिन

Bone marrow ह्याला आस्तिमज्या असे मराठीत
नाव आहे
यात तांबड्या रक्त पेशी ,पांढऱ्या रक्त पेशी आणि
प्लेटलेट तयार होतात. प्लेटलेट रक्त प्रवाह वाहत
असेल तर रक्त थांबावण्यास मदत करतात
बेंझिन च्या तीव्र सानिध्यात Bone Marrow
ची हानी होते.हे  शताकाहून अधिक काळ माहिती आहे
19 व्या शतकात उशिरा बेंझिन उद्योगांत वापरात आले,त्यामुळे
बहुतेक कामगाराच्या आरोग्यास अपाय झाला.

संपर्काची तीव्रता 
सौम्य असल्यास असे वाटले की मानवाला अपाय होत नसावा
संपर्काची तीव्रता  अधिक असल्यास खूप शेकडा भाग
10लाखात असल्यास PPM (Parts Per Million)
तर त्याचा परिणाम कामगारांच्या आरोग्या वर होतो.
तांबडया पेशी पांढऱ्या पेशी आणि /  किंवा थ्रोम्बोसाईट्स
रक्ताभिसरणातील रक्ता मध्ये कमी होतात.
ह्या नंतर Pancytopenia  होतो
याचा अर्थ तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स
या रक्तात कमी होतात 
याला Aplastic Anemia असे ही बोलले जाते.

बेंझिन मुळे रक्तातील पेशी कमी होण्याची प्रक्रीयेला
संपर्कात आल्यापासून काही महिने लागतात

पण लुकेमियाहोण्यासाठी काही वर्षे बेंझीन चा संपर्क आल्या पासून
लागू शकतात.

Ref  Int J Environ Res Public Health
        2012 Aug : 9(8): 2875----2893
        Robert Snyder

No comments:

Post a Comment